२०१६ रिपब्लिकन पक्ष प्राथमिक निवडणूक
From Wikipedia, the free encyclopedia
२०१६ रिपब्लिकन पक्ष प्राथमिक निवडणूक ही अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षांतर्गत निवडणूक होती. अमेरिकेतील ५० राज्ये व वॉशिंग्टन डी.सी. मधील या निवडणूकांतून २०१६ च्या राष्ट्राध्यक्षीय निवडणूकीतील रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार ठरविण्यात आला. उद्योगपती डॉनल्ड ट्रंपने प्राथमिक निवडणुकांमध्ये सपशेल विजय मिळवून पक्षाचे नामांकन पटकावले. जुलै २०१६ मध्ये झालेल्या २०१६ रिपब्लिकन पक्ष अधिवेशनामध्ये ट्रंपच्या उमेदवारीवर अधिकृतपणे शिक्कामोर्तब केले गेले.
२ फेब्रुवारी ते १४ जून, २०१६ दरम्यान होणाऱ्या या निवडणूकांमध्ये १७ प्रमुख उमेदवार होते. आयोवामध्ये पहिल्या निवडणूकीत मतदान सुरू होपर्यंत यातील १२ उमेदवार उरले. ५ मार्च रोजी ४ उमेदवार रिंगणात उरले होते. ४ मे रोजी ट्रम्पशिवाय उरलेल्या उमेदवारांनी माघार घेतल्यावर ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार होणार हे नक्की झाले.