सुभाष घई
भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक / From Wikipedia, the free encyclopedia
सुभाष घई ( जानेवारी २४, इ.स. १९४५) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व पटकथालेखक आहे. त्याने इ.स. १९८२ साली मुक्ता आर्ट्स नावाची चित्रपटनिर्मिती कंपनी स्थापली. त्याने निर्मिलेल्या चित्रपटांतील कर्ज (इ.स. १९८०), हीरो (इ.स. १९८३), मेरी जंग (इ.स. १९८५), राम लखन (इ.स. १९८९), सौदागर (इ.स. १९९१), खलनायक (इ.स. १९९३), परदेस (इ.स. १९९७) व ताल (इ.स. १९९९) हे चित्रपट लोकप्रिय ठरले. सौदागर ह्या चित्रपटासाठी त्याला १९९२ सालचा सर्वोत्तम दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
जलद तथ्य सुभाष घई, जन्म ...
सुभाष घई | |
---|---|
जन्म |
२४ जानेवारी, १९४५ (1945-01-24) (वय: ७९) नागपूर, मध्य प्रांत, ब्रिटिश भारत (आजचा महाराष्ट्र) |
राष्ट्रीयत्व | भारत |
कार्यक्षेत्र | चित्रपट दिग्दर्शक, निर्माता |
कारकीर्दीचा काळ | १९७० - चालू |
पत्नी | मुक्ता घई |
अधिकृत संकेतस्थळ | http://muktaarts.com/ |
बंद करा