रिव्हरसाइड काउंटी (कॅलिफोर्निया)
From Wikipedia, the free encyclopedia
रिव्हरसाइड काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र रिव्हरसाइड शहरात आहे.[1]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २४,१८,१८५ इतकी होती.[2][3] ही अमेरिकेतील १०वी सर्वाधिक लोकसंख्या असलेली काउंटी आहे.
या काउंटीची रचना १८९३मध्ये झाली.[4] रिव्हरसाइड काउंटी सान बर्नार्डिनो-ऑन्टॅरियो महानगरक्षेत्राचा भाग आहे. या प्रदेशास इनलँड एम्पायर असेही म्हणतात.