पंजाबी भाषा
From Wikipedia, the free encyclopedia
पंजाबी ही दक्षिण आशियामधील एक प्रमुख भाषा आहे.[1] जगभर सुमारे १३ कोटी भाषिक असणारी पंजाबी जगातील नवव्या क्रमांकाची सर्वाधिक वापरली जाणारी भाषा आहे. पंजाबी व्यक्तींची ही मातृभाषा असून भारत व पाकिस्तान देशांत विभागल्या गेलेल्या पंजाब प्रदेशामधील प्रमुख भाषा आहे. हे इंडो यूरोपियन मधली एकमेव जिवंत भाषा आहे जे की फुल्लीटोनल भाषा आहे.[2]
पंजाबी | |
---|---|
ਪੰਜਾਬੀ, پنجابی, पंजाबी | |
स्थानिक वापर | भारत, पाकिस्तान |
प्रदेश | पंजाब प्रदेश |
लोकसंख्या | १३ कोटी |
भाषाकुळ |
इंडो-युरोपीय
|
लिपी | गुरमुखी, शाहमुखी |
अधिकृत दर्जा | |
प्रशासकीय वापर | |
भाषा संकेत | |
ISO ६३९-१ | pa |
ISO ६३९-२ | pan |
ISO ६३९-३ | pan (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर) |
पंजाबी पाकिस्तानामधील प्रथम तर भारतामध्ये अकराव्या क्रमांकाची भाषा असून कॅनडा व युनायटेड किंग्डममध्ये पंजाबी भाषिकांची संख्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. एका पाहणीनुसार पाकिस्तानमध्ये ७.६ कोटी (२००८), भारतामध्ये ३.३ कोटी (२०११), युनायटेड किंग्डममध्ये १३ लाख (२०००) तर कॅनडामध्ये ३.६८ लाख (२००६) पंजाबी भाषिक होते. पंजाबी युनायटेड किंग्डम मधे चौथ्या क्रमांका पेक्षा बोलीभाषा अधिक आहे आणि कॅनडा मधे मूळ भाषा म्हणून (इंग्रजी आणि फ्रेंच नंतर). आधी निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संयुक्त अरब अमिरात, युनायटेड स्टेट्स, सौदी अरेबिया, आणि ऑस्ट्रेलिया यामधे भाषांची लक्षणीय उपस्थिती आहे. भारतामध्ये अमृतसर, जालंधर, चंदीगड, लुधियाना ही प्रमुख पंजाबी भाषिक महानगरे आहेत. लाहोर शहरामधील ८६ टक्के तर पाकिस्तानमधील ४४ टक्के लोक पंजाबी भाषिक आहेत.
भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार पंजाबी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे.[3] भारताच्या सिनेउद्योगामध्ये पंजाबीला विशेष स्थान असून बॉलिवूड चित्रपटांमधील ५० टक्क्यांहून अधिक लोकप्रिय गाणी पंजाबी भाषेमध्ये असतात. पंजाबची सांस्कृतिक भाषा बॉलीवूडच्या खूप साऱ्या गान्यासोबत भारतीय उपखंडाशी खूप मोठ्या प्रमाणात जुलला आहे किंवा पंजाबी मधे गायल्या जाते.[4]
बाराव्या शतकामध्ये एक स्वतंत्र भाषा म्हणून उदयास आलेली पंजाबी पंधराव्या शतकामध्ये स्थापन झालेल्या शीख धर्मामधील मुख्य भाषा बनली. गुरू ग्रंथ साहिब हा शीखांचा पवित्र ग्रंथ प्रामुख्याने गुरमुखी लिपी वापरून पंजाबीमध्येच लिहिला गेला आहे. गुरू नानकांच्या आयुष्यावर लिहिला गेलेला जनमसाखी हा कथासंग्रह सर्वात जुन्या पंजाबी वाङमयापैकी एक मानला जातो. शाह हुसेन, सुलतान बाबू, शाह शरफ बुल्ले शाह इत्यादी मध्य युगीन सूफी पंजाबी कवी होऊन गेले.