तोरिनो
From Wikipedia, the free encyclopedia
तोरिनो किंवा तुरिन (इटालियन: Torino, It-Torino.ogg ; प्यिमॉंतीज: Turin) ही इटली देशाच्या मधील प्यिमॉंत प्रदेशाची राजधानी व उत्तर इटलीमधील एक मोठे औद्योगिक व सांस्कृतिक केंद्र आहे. इटलीच्या वायव्य भागात पो नदीच्या काठावर व आल्प्स पर्वतरांगांमध्ये वसलेल्या तोरिनो शहराची लोकसंख्या २००९ साली ९,१०,१८८ इतकी तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे १७ लाख आहे.
तोरिनो Torino |
||
इटलीमधील शहर | ||
|
||
गुणक: 45°4′0″N 7°42′0″E |
||
देश | इटली | |
प्रदेश | प्यिमॉंत | |
क्षेत्रफळ | १३०.२ चौ. किमी (५०.३ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | ७८४ फूट (२३९ मी) | |
लोकसंख्या | ||
- शहर | ९,१०,१८८ | |
- घनता | ६,९९२ /चौ. किमी (१८,११० /चौ. मैल) | |
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | |
comune.torino.it |
इटलीच्या सांस्कृतिक इतिहासात तोरिनोला मानाचे स्थान आहे. येथील कला संग्रहालये, ओपेरागृहे ग्रंथालये, चर्च, उद्याने व भोजनालये प्रसिद्ध आहेत. पर्यटन हा येथील एक मोठा उद्योग असून इटलीमधील पहिल्या दहा व जगातील २५० पर्यटनस्थळांमध्ये तोरिनोची गणना होते. ५८ अब्ज डॉलर इतकी आर्थिक उलाढाल असणारे तोरिनो हे आर्थिक दृष्ट्या इटलीमधील रोम व मिलानखालोखाल तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. इटलीमधील मोटारवाहन उद्योगाचे तोरिनो हे सर्वात मोठे केंद्र आहे. फियाट कंपनीचे मुख्यालय ह्याच शहरात आहे.