कॅनडा
उत्तर अमेरिका खंडाच्या उत्तरेस असलेला देश / From Wikipedia, the free encyclopedia
कॅनडा हा उत्तर अमेरिका खंडाच्या उत्तरेस असलेला देश आहे. एकूण दहा प्रांत आणि तीन प्रादेशिक विभाग असलेल्या देशाच्या पूर्वेस अटलांटिक महासागर, पश्चिमेस प्रशांत महासागर तर उत्तरेस आर्क्टिक महासागर आहे. सुमारे ९९.८ लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळाने कॅनडाला जगातील सगळ्यात मोठ्या देशांच्या यादीत द्वितीय स्थान दिले आहे. दक्षिणेस, दोन देशांना विभागणारी जगातली सर्वात लांब आंतराष्ट्रीय सीमारेषा कॅनडा आणि अमेरिकेच्या दरम्यान असून हिची लांबी ८,८९१ किलोमीटर इतकी आहे. कॅनडाची राजधानी ऑटावा आहे. कॅनडातील प्रमुख शहरे टोरोंटो, व्हॅन्कुव्हर, माँत्रिआल आहेत.
जलद तथ्य महत्त्वपूर्ण घटना, क्षेत्रफळ ...
कॅनडा Canada कॅनडा | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: A Mari Usque Ad Mare (लॅटिन) (समुद्रापासून समुद्रापर्यंत) | |||||
राष्ट्रगीत: ओ कॅनडा | |||||
कॅनडाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी | ओटावा | ||||
सर्वात मोठे शहर | टोरॉंटो | ||||
अधिकृत भाषा | इंग्रजी, फ्रेंच | ||||
- राष्ट्रप्रमुख | युनायटेड किंग्डमचा तिसरा चार्ल्स, मेरी सायमन (गव्हर्नर जनरल) | ||||
- पंतप्रधान | जस्टिन ट्रुडो | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | (ब्रिटनपासून) जुलै १, १८६७ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ९९,८४,६७० किमी२ (२वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | ८.९२ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | ३,७६,०२,१०३ (३६वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ३.९२ चौ. किमी/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | १.१०५ निखर्व अमेरिकन डॉलर (११वा क्रमांक) | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | ३४,२७३ अमेरिकन डॉलर (७वा क्रमांक) | ||||
राष्ट्रीय चलन | कॅनेडियन डॉलर | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | यूटीसी -३.५ ते -८ -२.५ ते -७ (DST) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | CA | ||||
आंतरजाल प्रत्यय | .ca | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +१ | ||||
बंद करा