अलेक्सांदर देस्प्ला
From Wikipedia, the free encyclopedia
अलेक्सांदर माईकल जेरार्ड देस्प्ला (२३ ऑगस्ट, १९६१ - ) हे एक फ्रेंच संगीत दिग्दर्शक आणि संगीत संयोजक आहेत. त्यांना द ग्रांड बुडापेस्ट हॉटेल आणि द शेप ऑफ वॉटर ह्या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक म्हणून दोन अकादमी पुरस्कार, ह्या व्यातीरीक्त त्यांना अकादमी पुरस्काराची ९ नामांकने मिळाली आहेत, ३ सीझर पुरस्कार आणि ९ नामांकाने, ३ बाफ्टा पुरस्कार आणि १० नामांकने, २ गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि ११ नामांकने आणि २ ग्रामी पुरस्कार आणि १० नामांकने मिळाली आहेत.[1]
अलेक्सांदर देस्प्ला | |
---|---|
२०१५ मध्ये अलेक्सांदर देस्प्ला | |
जन्म नाव | अलेक्सांदर माईकल जेरार्ड देस्प्ला |
जन्म |
२३ ऑगस्ट १९६१ पॅरीस , फ्रांस |
राष्ट्रीयत्व | फ्रेंच |
कार्यक्षेत्र | संगीत, वादन, पार्श्वसंगीतकार, ऑर्केसट्रा कंडक्टर |
पुरस्कार | ऑस्कर पुरस्कार |
संकेतस्थळ | Alexandredesplat.net |
देस्प्ला ह्यांनी आत्तापर्यंत लोकप्रिय चित्रपटांसाठी आणि कमी बजेट असलेल्या चित्रपटांसाठीदेखील संगीत दिग्दर्शन आणि संयोजन केले आहे. द क्वीन, द गोल्डन कम्पास, द क्युरीयस केस ऑफ बेन्जॅमिन बटन, द ट्वायलाईट सागा: न्यू मून, फॅन्टास्टीक मिस्टर फॉक्स, हॅरी पॉटर अंॅड द डेथली हॅलोज- पार्ट १ अंॅड २, लिटील विमेन, द किंग्स स्पीच, द डॅनिश गर्ल, द इमिटेशन गेम, मूनराईज किंग्डम, आरगो, राईज ऑफ द गर्डीयन्स, झीरो डार्क थर्टी, द मिडनाईट स्काय, गॉडझीला, अनब्रोकन, द सीक्रेट लाईफ ऑफ पेट्स आणि द आईल ऑफ डॉग्स हे त्यांनी संगीत दिग्दर्शन केलेल्या चित्रपटांमधील काही आहेत.[2]